शासन आणि व्यवसायासाठी नाविन्यपूर्ण भाषा पर्याय
दबिगवर्ड इंटरप्रिटेशन आणि अनुवाद तंत्रज्ञानामध्ये जगात अग्रेसर आहे, जी शासकीय आणि ग्लोबल ब्रॅण्डच्या सर्व भाषांशी निगडीत गरजा भागवते.
आमच्या भाषातज्ञ आणि लोकलायझेशन तज्ञांच्या जागतिक टीमसह आम्ही गुणवत्ता, विश्वासार्हता आणि परिवर्तनशीलता यासाठी प्रतिष्ठा निर्माण केली आहे.


आम्ही काय करतो
व्यावसायिकांसाठी भाषा सेवा
जसजसे जग जवळ येऊ लागते तसतशी भाषासेवांची आवश्यकता वाढत जाते. आम्ही समुदायांना सेवांचा सुलभ ऍक्सेस मिळावा यासाठी इंटरप्रीटेशन सेवा आणि सीमेपलीकडे ब्रँड पोहोचविण्यासाठी अनुवाद सेवा प्रदान करतो.
एकीकृत प्लॅटफॉर्म
अभिनव गुणवत्तेचे आश्वासन देणारे
तंत्रज्ञान
वर्डसिंक हा दबिगवर्ड समुहाचा भाषा-सॉफ्टवेअर समाधान प्रदान करणारा एकीकृत प्लॅटफॉर्म आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आणि ब्रॅण्ड्सपासून, ज्यामध्ये सिलिकॉन व्हॅली मधील सुप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे, ते ब्रिटिश आणि यूएस शासकीय विभागांपर्यंत आमच्या सर्व ग्राहकांकडून याचा वापर केला जातो.
- मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिक्युरिटीद्वारे सुरक्षित
- इंटरनेट कनेक्शनद्वारे कुठूनही ऍक्सेसिबल आहे
- इंटरप्रिटर्स आणि सेवा वापरकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी मोबाईल ऍप्स
- व्यवस्थापनाचे विस्तारित रिपोर्टिंग
- अंगभूत स्वयंचलन आणि एआय समर्थित सेवा

आम्ही पुरवत असलेल्या सेवा
इंटरप्रिटींग
आमच्या मालकीच्या तांत्रिक साधनांनी सक्षमीकृत केलेल्या ऑन साईट, दूरस्थ सेवा. संवेदनशील आणि जटिल परिस्थितीमध्ये आमच्या पारंपारिक फेस-टू-फेस सेवा आवश्यक आहेत. आमच्या आरोग्यसेवा आणि विधीक्षेत्रातील ग्राहकांच्या पसंतीची ही सेवा आहे ज्यांना फेस-टू-फेस इंटरप्रीटरच्या वैयक्तिक सेवेची आवश्यकता असते.
- २५० हून अधिक भाषांना सपोर्ट
- फेस-टू-फेस इंटरप्रिटिंग
- टेलिफोन इंटरप्रिटिंग
- व्हीडियो रिमोट इंटरप्रिटिंग
आम्ही पुरवत असलेल्या सेवा
अनुवाद
कोणत्याही आव्हानासाठी लेखी भाषेचे समर्थन. आमच्या व्यावसायिक भाषांतर सेवांमध्ये जगातील अग्रगण्य भाषा सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या वैयक्तिक सेवांचा समावेश आहे. एआयद्वारे समर्थित मशीन ट्रान्सलेशन ह्युमन ट्रान्सलेशनच्या तपशीलवार सेवेला एक प्रभावी पर्याय उपलब्ध करून देते. किंवा याहूनही अधिक गुणवत्तेसाठी फक्त अनुवादच नाही तर आपला कंटेंट पुन्हा कल्पित करण्यासाठी आम्ही कुशल विद्वत्ता असलेले विशेष अनुवादक देऊ करतो.
- मशीन ट्रान्सलेशन
- ऑगमेंटेड मशीन ट्रान्सलेशन
- ह्युमन ट्रान्सलेशन
आम्ही पुरवत असलेल्या सेवा
ट्रान्सक्रिप्शन
स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर न्याय विभागांचा प्रमुख पुरवठादार म्हणून आम्ही कायदेशीर कार्यवाही आणि तुरूंग सुरक्षा हमी संबंधित आव्हानात्मक ट्रान्सक्रिप्शनच्या विनंत्या हाताळण्यासाठी व्यवस्थितपणे तयार आहोत. जिथे ट्रान्सक्रिप्शनची आवश्यकता आहे अशा आव्हानात्मक परिस्थितींमध्ये सपोर्ट करण्यासाठी शक्य तितके परिवर्तनशील राहून आम्ही जवळजवळ सर्व प्रकारच्या आणि स्वरुपातील फाईलवर काम करू शकतो.
- अनुरूप आणि सुरक्षित
- अचूक आणि व्यावसायिक
- जलद आणि कार्यक्षम
आम्ही पुरवत असलेल्या सेवा
स्टाफिंग समाधान
आमची विशेषीकृत भरती प्रक्रिया उद्योगात सर्वात कठोर प्रक्रिया आहे. एखादया जागतिक कार्याचे व्यवस्थापन करणे ही एक प्रचंड कठीण गोष्ट असू शकते. आमचे अनुभवी नियोक्ते आमच्या नोंदणीकृत कॉन्ट्रॅक्टर्स डेटाबेसमधून अद्यावत तंत्रज्ञान साधनांचा वापर करून दृष्टिआड असलेले संभाव्य उमेदवार कुठे आहेत हे शोधून काढतात आणि त्यांना कामात गुंतवतात.
- आउटसोर्स केलेली भरती
- विषयतज्ञ
- व्यवस्थापन आणि amp; प्रशिक्षण





वर्डसिंक नेटवर्क
भाषातज्ञांना लक्षात घेऊन तयार केलेले
आमचे भाषातज्ञांचे वाढत जाणारे नेटवर्क सर्व सेवा तत्परतेने पुरवू शकते तसेच त्यांचे प्रोफाइल नियंत्रित करू शकते.रीअल-टाइम अपडेट्सच्या सहाय्याने, भाषातज्ञ जगात कुठेही असले तरी सर्व अनुवादाची आणि इंटरप्रिटेशनची कार्ये करू शकतात, जगात कोठेही असलेल्या संधी स्वीकारू शकतात आणि ग्राहकांना सपोर्ट करू शकतात.
वर्डसिंक नेटवर्क ऍपच्या सहाय्याने कुठूनही आपले बुकिंग करा
आपण जगात कुठेही असलात तरी आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट अनुभव सुनिश्चित करण्यासाठी आम्ही विकसित केलेल्या वर्डसिंक नेटवर्कच्या पूर्णपणे मोबाइल ऑप्टिमाइझ केलेल्या आवृत्तीसह कार्य करीत रहा.
जास्तीत जास्त ऍक्सेसिबल असावे म्हणून आमचे प्रगत मोबाइल ऍप गुगल प्ले आणि ऍपल अँप्लिकेशन स्टोअरवर सुद्धा उपलब्ध असेल. ते डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.


युनिलिव्हर
दबिगवर्डशी केलेल्या सहयोगामुळे गुणवत्तेची तडजोड न करता कोणकोणत्या मार्गांनी अनुवादाचा खर्च कमी करता येतो हे समजून घेण्यास आम्हाला मदत झाली आहे.
पेबॅक आधीपासूनच आमच्या ट्रान्सलेशन मेमरी सेव्हिंगमध्ये दिसत आहे आणि आम्हाला खात्री आहे की पुढेही असेच यश मिळत राहावे म्हणून दबिगवर्ड तंत्रज्ञान समाधान आमच्या व्यवसायाच्या अनुषंगाने द्रुतगतीने विकसित होत आहे.

आयबीएम
दबिगबर्डने आम्हाला अगदी जे हवे होते तेच दिले
आमच्या आधीच्या पुरवठादाराच्या तुलनेत भाषेच्या सपोर्टसाठी बरीच सुधारित सेवा – पैशाचा योग्य मोबदला आणि याचा अर्थ असा आहे की आम्ही पुरेशी बचत केली आहे.

सील्ड एअर
त्यांचे कर्मचारी जलद काम करण्यात पटाईत आहेत – आमच्याकडे असे काही प्रोजेक्ट्स होते ज्यासाठी आम्हाला बिलकुल वेळ दिला गेला नव्हता, परंतु त्यांनी ते सफाईने पूर्ण केले. विभिन्न टाइम झोन्स मध्ये ते अत्यंत सफाईने काम करतात आणि आमची शब्दावली शिकण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते परिस्थितीनुसार बदलण्यास तयार असतात आणि जर काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे असे आम्हाला आढळल्यास ते नेहमीच त्याला पटकन प्रतिसाद देतात.
मँचेस्टर कौंटी कोर्ट
जरी बुकिंग शेवटच्या क्षणी केले गेले होते तरीही इंटरप्रीटर १५ मिनिटे लवकर आला आणि कोर्टाच्या सुनावणी दरम्यान आणि त्यानंतर अशा दोन्ही वेळी आम्हाला मिळालेली सेवा उत्कृष्ट होती.
ग्लॅक्सोस्मिथक्लाईन
एखादी आव्हानात्मक गोष्ट सोपी करण्यात दबिगवर्डने आमच्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. संपूर्ण अनुवादाची प्रक्रिया अत्यंत सहजतेने आणि कार्यक्षमतेने चालते.
हनीवेल
संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी दबिगवर्डमध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधीं आहेत आणि प्रत्येक स्टेप समजावून सांगण्यासाठी ते आपल्याला मदत करतात जसे काही त्यांना केवळ आमचीच चिंता होती. संप्रेषण उत्कृष्ट आहे, समस्या वेळेवर आणि मैत्रीपूर्णरित्या सोडविल्या जातात आणि प्रोजेक्ट्स नेहमी अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण केले जातात.

हार्ले डेव्हिडसन
दबिगवर्ड आमचा महत्वाचा भागीदार आहे, ज्यामुळे आमच्या नवीन वेबसाइटचा सात वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद करणे सुरळीत आणि सोपे झाले.

झेरॉक्स
इंटिग्रेटेड न्यूरल मशीन ट्रान्सलेशन (एआय द्वारे समर्थित) मुळे आम्हाला खर्च कमी करण्यास, मार्केटमध्ये गती सुधारण्यास आणि भाषेची गुणवत्ता राखण्यास मदत झाली आहे. लाँच केल्यानंतर काही आठवड्यांतच आम्हाला या दृष्टिकोनाचे फायदे दिसायला लागले आहेत आणि अशी अपेक्षा आहे की मशीन्स सतत सुधारत/शिकत राहतील जेणेकरून वेळोवेळी आमची बचत होऊ शकेल.
मेट्रोपॉलिटन पोलीस
तपासणीदरम्यान मिळविलेल्या पुरावे नसलेल्या सामग्रीच्या पुनरावलोकन प्रक्रियेवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे हे पुराव्या इतकेच महत्वाचे आहे. दबिगवर्डच्या मशीन ट्रान्सलेशन तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने आमच्या टीमला मजबूत आणि निर्णायक तपासणीवर लक्ष केंद्रित करण्याचे स्वातंत्र्य मिळाले.

एनएचएस
जेव्हा एखादी दुसरी भाषा बोलणारा रूग्ण येतो, तेव्हा आम्हाला माहित आहे की आम्ही दबिगवर्डचेद्वारे फोनवरून ३० सेकंदात २५७ वेगवेगळ्या भाषांपैकी एक भाषा बोलणाऱ्या इंटरप्रीटरची व्यवस्था करू शकतो. रुग्णाच्या अनुभवाच्या दर्जावर कोणताही नकारात्मक परिणाम न होऊ देता आम्ही आता मोठ्या रकमेची बचत करू शकतो आणि अधिक लवचिक सेवा मिळवू शकतो.
सुरक्षा
जागतिक व्यवसायांसाठी सुरक्षा
जागतिक व्यवसायांसाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह भाषा सहकार्य सेवांचा जलद ऍक्सेस.
सुरक्षा
आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड – सोल्यूशन्सपैकी एक आहे.
मायक्रोसॉफ्ट अझुर
असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत.
आयएसओ अनुपालित
आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो.त्यांचा डेटा उत्कृष्ट पद्धतीने हाताळण्यासह.
अनुपालन
आमचे बरेच ग्राहक पर्यावरणपूरक आणि कार्बनमुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड १००% कार्बनमुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.
व्यवसायांना जागतिक स्तरावर सेवा प्रदान करत आहे
भाषा क्षेत्रातील ४०हून अधिक वर्षांच्या सेवांनी आम्हाला जागतिक व्यवसायांचा आणि शासनांचा भाषेचा आदर्श भागीदार बनविले आहे.
15000
व्यावसायिक भाषातज्ञ
१ बिलियन
दरवर्षी अनुवादित केले जाणारे शब्द
१ मिलियन
एका महिन्यामध्ये टेलिफोनद्वारे इंटरप्रिटिंग केलेली मिनिटे
15
प्रोक्युरमेन्ट फ्रेमवर्क
आमच्याशी संपर्क साधा
आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा.
आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.
- आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
- बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
- वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
- मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
- प्रत्येकवेळी उत्कृष्ट सेवा वितरित
Get in touch
Please contact our Sales Team for any information regarding our services and to discuss how they can benefit you. We monitor our enquiries inbox regularly and will respond to all requests as we are able to.
- Interpretation, translation and localisation services to help you trade anytime, anywhere
- Agile technology at the touch of a button
- Timely solutions available 24/7/365
- Strong, long-term client partnerships
- Delivering the best services every time