दबिगवर्डबद्दल

जागतिक व्यापारास पाठिंबा देऊन आणि लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषांमध्ये सेवांचा वापर करण्यासाठी मदत करून दबिगवर्ड जगाला जवळ आणते.

जसजसे जग जवळ येऊ लागते तसतशी भाषासेवांची आवश्यकता वाढत जाते. प्रत्येक वेळी योग्य उपाय, कौशल्य आणि मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता दबिगवर्डकडे आहे.


सर्वोत्तम

दररोज जगभरातील ५०,००० कार्ये हाताळत असताना व्यवसाय, सार्वजनिक क्षेत्र आणि वैयक्तिक पातळीवर आम्ही सर्वोत्तम अनुवाद, इंटरप्रिटेशन, लोकलायझेशन आणि भाषा तंत्रज्ञान समाधान प्रदान करतो.

जागतिक पुरवठादार

“जागतिक पातळीवर विचार करून आपला स्थानिक विकास करा” या दृष्टिकोनासह आम्ही खरोखरच एक जागतिक व्यवसाय आहोत – आम्ही आमच्या ग्राहकांना सर्व भाषांच्या भाषिकांसमवेत स्पष्टपणे संवाद साधण्यास सक्षम बनवितो.

अग्रगण्य तंत्रज्ञान

आमच्यासाठी उत्तम सेवा म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक ग्राहकाच्या खर्च, गुणवत्ता आणि डिलिव्हरी याबाबतच्या अपेक्षा पूर्ण करणे. हे आम्ही अभिनव भाषा तंत्रज्ञान, तज्ञ कार्य करणारी टीम आणि १५,००० प्रतिभावान भाषातज्ञांच्या नेटवर्कद्वारे प्राप्त केले आहे.

आमची मूल्ये

आम्ही जगभरतील शीर्ष १६ भाषा सेवा प्रदात्यांपैकी एक आणि युरोपमधील सर्वात मोठे इंटरप्रिटिंग सेवा प्रदाता आहोत. महत्त्वाचे म्हणजे एका महान समुदायासह आम्ही एक कर्तव्यनिष्ठ नियोक्ता आहोत.

उत्कृष्टता

व्यावसायिक म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक बाबतीत उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतो.

नेतृत्व

एआय भाषा तंत्रज्ञानामध्ये अग्रणी असलेले आम्ही ट्रेंड्स तयार करतो आणि उद्योगास प्रेरित करतो.

कल्पकता

अत्याधुनिक विचार आणि एआय तंत्रज्ञानामध्ये आमच्या सुरु असलेल्या गुंतवणूकीद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांसाठी मार्केटसाठी तयार असलेले समाधान आणि मूल्य यांची निर्मिती आणि डिलिव्हरी करतो.

विश्वासार्ह

जगातील सर्वाधिक मागणी असलेल्या ब्रँड्सना यशस्वी समाधान पुराविण्याचा ४० वर्षांचा अनुभव.

सबलीकरण

आमचा आमच्या लोकांवर विश्वास आहे आणि त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्यास मदत करून आम्ही त्यांचा विकास करण्यासाठी मदत करतो. आम्ही त्यांना आमचा संधीचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणून ओळखतो.

आमचे संचालक मंडळ

जोश गोल्ड, सीइओ

समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. गोल्ड, सर्व मार्केट्सवर लक्ष ठेवून, जागतिक वाढीसाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी क्रॉस-फंक्शनल टीम्सचे नेतृत्व करून यशाचा आनंद घेत आहेत.

मार्क डॅले, ग्लोबल ऑपरेशंस ऑफिसर

मार्क दबिगवर्डचे चीफ ऑपेरेटिंग ऑफिसर असून ५ वर्षे या व्यवसायात आहेत. मार्क हे व्यवसायांच्या जागतिक ग्राहक अनुभव रणनीतीची संरचना आणि डिलिव्हरी यासाठी जबाबदार आहेत.

क्लारा रिचेस, ग्रुप चीफ कमर्शिअल ऑफिसर

क्लारा यांना भाषा उद्योगात १८ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि त्या समूहातील सर्व व्यावसायिक मोहिमांचे नेतृत्व करतात. क्लारा यांच्यावर आमच्या ताबा घेणे, प्रस्ताव मांडणे आणि प्राइसिंग कार्यक्रम या जबाबदाऱ्या आहेत.

अँडी लाइटॉवलर, ग्रुप चीफ फायनांशीअल ऑफिसर

अँडी हे दबिगवर्डचे समूहाचे फायनान्स डायरेक्टर आहेत. कंपनीबरोबर १८ वर्षे काम केलेले अँडी आता व्यवसायाच्या दैनंदिन आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात.

लीन ग्रेग, ग्रुप चीफ पीपल ऑफिसर

लीन ह्या अध्ययन आणि विकास, व्यवस्थापन विकास आणि नेतृत्व या क्षेत्रांमध्ये प्रचंड अनुभव असलेल्या एक वरिष्ठ मानवसंसाधन विशेषज्ञ आहेत.

लुईस सांगिओव्हन्नी, ग्रुप चीफ मार्केटिंग ऑफिसर

लुईस दबिगवर्डची मार्केटिंग रणनीती आणि युती आणि सामरिक भागीदारी कार्यक्रम चालविण्यास आणि अंमलात आणण्यास जबाबदार आहेत. मध्य अमेरिका आणि युरोपमध्ये लुईस यांनी आपल्या कारकीर्दीत मार्केटींगच्या दोन्ही बाजूंना काम केले आहे.

मार्क राईस, ग्रुप चीफ इंफोर्मेशन ऑफिसर

मार्क दबिगवर्डच्या तंत्रज्ञान कार्यसंघाचे नेतृत्व करतात. नवीन डिजिटल भविष्यासाठी तयार केलेल्या उत्पादनांसह संपूर्ण व्यवसायात नवीन गोष्टी पुढे नेणे याच्या बाबत मार्क हे उत्कट आहेत.

सुरक्षा

सुरक्षा आणि अनुपालन

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत: च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.