व्यवसायांसाठी व्यावसायिक, गुणवत्तेची हमी असलेल्या सपोर्ट सेवा
आम्ही एन्टरप्राईज ग्राहकांसाठी डेटा विश्लेषणापासून स्टाफिंग समाधानापर्यंत व्यवस्थापित सेवांचा एक संच देऊ करतो.
तातडीची मोठ्या प्रमाणावरील भरती, योजनाबद्ध डेटा विश्लेषण, ईलर्निंग आणि पारंपारिक कोर्स निर्मिती यामधील आमच्या अनुभवापासून बोध घेत, आम्ही आमच्या ग्राहकांची उन्नती व्हावी आणि त्यांना त्यांची ध्येय साध्य करता यावी यासाठी मदत करण्याचे लक्ष्य ठेवतो. त्यांच्या व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करून त्यांना नवीन आणि उत्साहवर्धक मार्केटची ओळख करून देतो.

आम्ही काय करतो
आमच्या व्यवस्थापित सेवांचा संच
आमच्या योजनात्मक डेटा विश्लेषण, कोर्स निर्मिती आणि इतर बऱ्याच गोष्टींमधील अनुभवाच्या आधारे आम्ही एन्टरप्राईज ग्राहकांसाठी व्यवस्थापित सेवांचा एक संच देऊ करतो.
ईलर्निंग कोर्स निर्मिती
पात्र लेखकांकडून पूर्णपणे मान्यताप्राप्त कोर्स निर्मिती
कोर्स डिलिव्हरी
वर्गातील पारंपारिक किंवा रिमोट ऑनलाइन शिक्षण
अंदाजात्मक विश्लेषणे
तपशीलवार व्यवस्थापन रिपोर्टिंग आणि गरजा समजावून घेणे
जागतिक स्टाफिंग समाधान
शासन आणि व्यवसायांसाठी आउटसोर्स केलेले स्टाफिंग समाधान
व्यवस्थापित सेवा
विश्लेषण
आपल्या व्यवसायाच्या प्रशिक्षणाच्या गरजा प्रस्थापित करण्यासाठी आणि प्रारंभिक संशोधन आणि आविष्कार मीटिंगमध्ये सहयोग करण्यासाठी, आम्ही सुचविलेले समाधान आपली उद्दीष्टे आणि एकूण संदेशाशी मिळतेजुळते आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एक मूल्यांकन पूर्ण करतो.
- आपल्या प्रशिक्षणाच्या गरजा प्रस्थापित करा
- प्रारंभिक संशोधनात सहयोग करा
- आमचे समाधान आपल्या उद्दीष्टांसह मिळतेजुळते असल्याचे सुनिश्चित करा
व्यवस्थापित सेवा
संरचना
प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी पुनरावलोकन आणि अभिप्राय टप्प्यापूर्वी आम्ही कोर्सचा आराखडा संरचित आणि डेव्हलप करतो. डेव्हलपमेंटच्या आधी आपल्याला एक संपूर्ण स्टोरीबोर्ड प्राप्त होईल ज्यात कंटेंट, टाइमलाइन आणि प्रशिक्षण सामग्रीची शैली प्रतिबिंबित झालेली दिसेल.
- कोर्सचा आराखडा संरचित आणि डेव्हलप करा
- सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी पुनरावलोकन आणि अभिप्राय स्टेज
- कंटेंट प्रतिबिंबित करणारा संपूर्ण स्टोरीबोर्ड
- प्रशिक्षण सामग्रीची टाइमलाइन आणि शैली
व्यवस्थापित सेवा
डेव्हलपमेंट
डेव्हलपमेंट स्टेज दरम्यान आम्ही लर्निंग टूल्स निर्माण करू, ज्यामध्ये स्थायी इन्फोग्राफिक्स, परस्परसंवादी व्हिडियो, ऍनिमेशन्स आणि व्हॉइस ओवर कंटेंट समाविष्ट आहेत. आपल्याला प्रक्रियेदरम्यान मदत करण्यासाठी आणि प्रत्येक स्टेजवर नियमित अपडेट्स देण्यासाठी आणि पुनरावलोकनासाठी आपल्याकडे एक प्रोजेक्ट व्यवस्थापक असेल.
- लर्निंग टूल्स निर्माण करा
- स्थायी इन्फोग्राफिक्स वापरणे
- परस्परसंवादी व्हिडियो, ऍनिमेशन्स आणि व्हॉइस ओवर कंटेंट
- प्रक्रियेदरम्यान मदत करण्यासाठी प्रोजेक्ट व्यवस्थापक
व्यवस्थापित सेवा
अंमलबजावणी
एकदा का प्रशिक्षण सामग्री तयार झाली की आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी नावनोंदणी प्रक्रिया वैयक्तिकरित्या, ऑनलाइन किंवा मिश्रित क्षमतेद्वारे डिलिव्हरीसह प्रस्थापित करण्यासाठी आपल्याबरोबर काम करू.
- नावनोंदणी प्रक्रिया प्रस्थापित करा
- वैयक्तिक, ऑनलाइन किंवा मिश्रित क्षमतेसाठी डिलिव्हरी
व्यवस्थापित सेवा
मूल्यांकन
आपण आणि आपल्या टीमबरोबर भागीदारीत काम करत असताना, आम्ही आपल्या उद्दीष्टांची पूर्तता आणि आपण पुरविलेल्या सामग्रीबरोबर प्रेक्षक पूर्णपणे व्यस्त आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी परिणाम, पूर्णत्व आणि प्रशिक्षण परस्परसंवादाच्या विश्लेषणाद्वारे एक अहवाल तयार करू.
- परिणामांचे विश्लेषण
- पूर्णत्व आणि प्रशिक्षण परस्परसंवाद
- सामग्रीबरोबर आपले प्रेक्षक पूर्णपणे व्यस्त असल्याची खात्री करा






डेटा आणि अंतर्दृष्टी
अंदाजात्मक विश्लेषणे
दबिगवर्डमध्ये आम्हाला कल्पना आहे की डेटा आणि अंतर्दृष्टी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचे महत्त्वाचा भाग आहेत. आपल्या कोणत्याही संभाव्य ‘असे झाले तर काय’ परिस्थितीत मदत करण्यासाठी आपली पुरवठा साखळी सुस्थितीत आहे हे आपल्याला माहित असल्याची खात्री करणे महत्वाचे आहे.
- आम्ही क्षमता, गुणवत्ता आणि रिअल टाईम डिलिव्हरी यामधील ट्रेन्डचे आकलन आणि विश्लेषण करण्यासाठी आपल्याला सक्षम बनवितो.
- आम्ही आपल्याबरोबर भागीदारी करून एक विश्लेषणात्मक समाधान तयार करू शकतो ज्यामुळे आपल्या गरजांची दखल घेतली जाईल, अहवालांमध्ये सानुकूलित डेटा जाहीर केला जाईल जेणेकरून याची खात्री होईल की आपण प्रत्यक्ष वेळेत तथ्यात्मक डेटाचा वापर करून व्यवस्थित विचार केलेले निर्णय घेऊ शकता.
- आमचे व्यवसाय बुद्धिमत्ता विशेषज्ञ प्रशिक्षण, सानुकूल विश्लेषण आणि विशेषीकृत अंतर्दृष्टी अहवाल प्रदान करून, अंदाज विश्लेषणात्मक समाधानांचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात.
आम्ही काय करतो
अद्ययावत समाधानांद्वारे कार्यप्रदर्शन आणि क्षमता व्यवस्थापित करणे
दबिगवर्डमध्ये आम्ही जाणतो की कामगिरी आणि उपलब्धता व्यवस्थापित करताना विविध प्रकारचे घटक लक्षात घेतले पाहिजेत. हे बऱ्याचदा आव्हानात्मक होऊ शकते, जिथे आमचे अत्याधुनिक समाधान कामास येते.

स्त्रोत क्षमता नियोजन
ही विश्लेषणे आपल्याला आपल्या कार्यात क्षमता समस्यांचे मूल्यांकन आणि निराकरण करण्यास सक्षम करतात. यात समाविष्ट आहे:
- भाषातज्ञ क्षमता
- कॉल सेंटर व्हॉल्यूम विश्लेषण
- शब्द गणना आणि प्रोजेक्टच्या आकाराचा अंदाज लावण्यासाठी अनुवाद ग्राहक विश्लेषण
- व्यवसाय निर्णायक क्षमता
- कॉल सेंटर क्षमता विश्लेषण

भाषा गुणवत्ता व्यवस्थापन
कार्यक्षमतेचा मागोवा घेण्यासाठी आणि प्रत्येक वेळी वेळेवर, उच्च गुणवत्तेची डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करण्यासाठी गुणवत्ता व्यवस्थापन विश्लेषण प्रदान करतो. यात समाविष्ट आहे:
- भाषातज्ञांच्या क्यूएचा मागोवा ठेवणे
- भाषातज्ञ कामगिरीचे परीक्षण करणे
- वेळेवर डिलिव्हरी देणे
- क्षमता व्यवस्थापन
- गुणवत्ता
- तक्रारी आणि अभिप्राय

इंटरप्रीटिंग समाधान
आमची अंदाजबांधणी करणारे विश्लेषण समाधान मागणीचे पूर्वानुमान आणि अंदाज विश्लेषणासह आपली मदत करू शकतात. यात समाविष्ट आहे:
- भाषातज्ञांकडून आलेल्या ऑफरचे फोरकास्ट मॉडेल
- पॉवरबीआय मधील परस्परसंवादी उच्च गतीचे मॅपिंग तंत्रज्ञान
- इंटरप्रीटेशन समस्यांच्या मूळ कारणाचे विश्लेषण
- टेलिफोन इंटरप्रीटेशनवर आधारित मागणीची अंदाजबांधणी
- रिअल टाईम टेलिफोन इंटरप्रीटिंग विश्लेषणे

प्रत्येक वेळी गुणवत्ता सेवा
गुणवत्तेची हमी
आम्हाला आमच्या ट्रॅक रेकॉर्डचा अभिमान आहे आणि आमच्याकडे भाषा सेवांमध्ये जागतिक दर्जाच्या गुणवत्तेचे समर्थन करू शकणाऱ्या सक्षम प्रक्रिया आहेत. आमच्या ग्राहक सेवांची गुणवत्ता आणि आमच्या तंत्रज्ञानाच्या साधनांची सुरक्षा सुनिश्चित करणारी अनेक आयएसओ प्रमाणपत्रे आमच्याकडे आहेत.
आमच्या लोकांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही उद्योगातील प्रमुख इंफ्लूएन्सरचे सक्रिय सदस्य आहोत आणि आमच्या भाषातज्ञांना स्वत:ची कौशल्य वाढविण्यासाठी आणि त्यातूनच आपल्या उद्योगाची स्थिती सुधारण्याची प्रत्येक संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतो.
आमची आकडेवारी
४०हून अधिक वर्षांच्या सेवांनी आम्हाला ग्लोबल ब्रॅण्ड्ससाठी सर्वोत्तम भाषा भागीदार बनविले आहे.
८०/१००
१०० अग्रगण्य कंपन्यांपैकी ८० कंपन्यांचा पुरवठादार
१०० +
नवीन मार्केट कॅम्पेन्स
१००० +
वार्षिक वेबसाईट स्थानिकीकरण
99%
वेळेवर डिलिव्हरी देण्याचा रेट
सुरक्षा
मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाली
ग्लोबल ब्रॅण्ड्ससाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह भाषा सहकार्य सेवांचा जलद ऍक्सेस.
सुरक्षा
आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.
मायक्रोसॉफ्ट अझुर
असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत.
आयएसओ अनुपालन
आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.
अनुपालन
आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.

वेकोप्लॅन
दबिगवर्डच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी त्यांच्या लीड्स आणि डसेलडॉर्फ या दोन्ही कार्यालयांद्वारे प्रदान केलेल्या सेवेच्या दर्जामध्ये आणि समाधानाच्या गुणवत्तेमध्ये चूक काढणे अशक्य आहे
दबिगवर्ड व्यावसायिक अनुवादासाठी एक उच्च दर्जाचे स्वयंचलित, संपूर्ण समाधान प्रदान करते. एक व्यवसाय म्हणून दिलेल्या डेडलाइइन्स पाळण्यातसुद्धा हे उत्तम आहेत.

एचएसबीसी
सुरक्षिततेशी तडजोड न करता आमच्या अनुवादाच्या प्रक्रियेस गती देण्यामध्ये दबिगवर्डने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हुआवाय
दबिगवर्डद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांच्या दर्जामध्ये आणि समाधानाच्या गुणवत्तेमध्ये दोष काढणे अशक्य आहे. व्यावसायिक अनुवादासाठी ते एक स्वयंचलित, संपूर्ण समाधान प्रदान करतात आणि नेहमीच वेळेवर डिलिव्हर करतात.

888.com
दबिगवर्डने जवळजवळ वेगवेगळ्या १५ भाषांमध्ये दररोजच्या हँडऑफच्या सहाय्याने प्रचंड प्रमाणात अनुवादाचे कार्य हाताळण्यासाठी 888.com साठी एक सानुकूल वर्कफ्लो समाधान तयार केले आहे.
आमच्याशी संपर्क साधा
आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा.
आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.
- आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
- बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
- वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
- मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
- प्रत्येकवेळी उत्कृष्ट सेवा वितरित