अखंड कनेक्टिव्हिटी

मानवी हस्तक्षेपाशिवाय अनुवादाच्या प्रोजेक्टबद्दल त्वरित अपडेट्स मिळविण्यासाठी आपली कंटेंट व्यवस्थापन प्रणाली थेट आमच्या वर्डसिंक प्लॅटफॉर्मशी जोडा.

प्लग करण्यासाठी तयार कनेक्टर्स

जेव्हा आपण अनुवाद आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडता तेव्हा वेळ वाचतो

आपल्या वेबसाईटचे किंवा डिजिटल कंटेंटचा अनुवाद करणे सोपे होऊ शकते. जेव्हा आपण वर्डसिंक कनेक्टर किंवा एपीआय वापरता तेव्हा आपण थेट आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म जसे की सीएमएस, पीआयएम किंवा डीएएमवर अनुवाद एम्बेड करता. यापुढे कॉपी आणि पेस्ट करणे, फाईलचा प्रकार किंवा एकाधिक आवृत्त्यांचा मागोवा ठेवणे याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. आपणास प्रकाशित करण्यास तयार असलेला उच्च-गुणवत्तेचा अनुवाद आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळतो. हे इतके जलद आणि सोपे आहे.

  1. व्यवस्थापनाच्या माहितीचे विश्लेषण
  2. अभिनव सेवा
  3. स्वयंचलन

अधिक जलद टर्नअराउंड

एआय समर्थित स्वयंचलनाद्वारे अनुवाद सेवांचा त्वरित, एनक्रिप्टेड ऍक्सेस

सानुकूल एपीआय एकत्रिकरणाच्या सहाय्याने जलद अनुवाद

आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनुवाद स्ट्रीमलाईन करण्यासाठी वर्डसिंक एपीआय क्लायंट लायब्ररीचा वापर करा. इष्टतम एकत्रीकरणासाठी आमच्या मजबूत साधनांमध्ये व्यापक डॉक्युमेंटेशनचा समावेश आहे.

आपल्या डिजिटल कंटेंटचा कार्यक्षम अनुवाद

आम्ही सामान्य डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी रेडीमेड ट्रान्सलेशन कनेक्टर विकसित केले आहेत. आपण आपले .NET, जावा किंवा पीएचपी आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म वर्डसिंकशी जोडून सानुकूल एकत्रीकरण तयार करण्यासाठी आमचे एपीआय देखील वापरू शकता. सानुकूल एकत्रीकरण वेळेची बचत करुन आपल्या डिजिटल कंटेंटचा अनुवाद सुलभ करते.

आम्ही काय करतो

संगणक समर्थित समाधान

उत्पादकता वाढवा

एकत्रीकरण आपल्या बहुभाषिक कंटेंट निर्मिती प्रक्रियेतील मॅन्युअल, वेळखाऊ प्रक्रिया काढून टाकते. आपल्याला अनुवादित करायचा असलेला कंटेंट निवडा आणि बाकी सर्व वर्डसिंक वर सोडून द्या. आपल्याला आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्यास तयार असलेले अनुवाद मिळतील.

क्लायंट लायब्ररीज मजबूत एकत्रीकरण करण्यात मदत करतात

आमच्या क्लायंट लायब्ररीज एकत्रीकरणामधील काही जटिल गोष्टींचे व्यवस्थापन करतात. त्या वर्डसिंक आणि आपली सिस्टम यांच्या दरम्यान मजबूत एकत्रीकरणासाठी लागणारा वेळ कमी करतात. आमचे एपीआय जास्तीत जास्त स्थिरतेसाठी तयार केलेले आहे, जेणेकरून नेटवर्कमध्ये व्यत्यय आल्यास आपण केलेले काम किंवा पूर्ण केलेला अनुवाद गमावणार नाही.

आम्ही आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मदत करतो

जेव्हा आपण आपला प्लॅटफॉर्म वर्डसिंकबरोबर जोडण्याचा निर्णय घेता, तेव्हा आम्ही घनिष्ठ सहयोगाची प्रक्रिया सुरू करतो. व्यापक डॉक्युमेंटेशन व्यतिरिक्त, आम्ही तज्ञ मार्गदर्शन देऊ करतो. आपल्याला एपीआय एकत्रीकरण उत्पादनाचे मालक आणि त्यामागचे डेव्हलपर्स यांचा ऍक्सेस असेल.

उच्च-गुणवत्तेच्या अनुवादाद्वारे अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचा

जेव्हा आपण आपला डिजिटल प्लॅटफॉर्म वर्डसिंकसोबत जोडता तेव्हा आपल्याला आमच्या १५००० भाषातज्ञांच्या नेटवर्कचा ऍक्सेस मिळतो जे ५०० पेक्षा जास्त भाषा संयोजनांमध्ये भाषांतर करू शकतात. आपल्याला कोणत्याही भाषेची आवश्यकता असो किंवा आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरीही आम्ही आपल्याला आपल्या गरजा भागविणाऱ्या भाषातज्ञांशी जोडून देऊ शकतो.

सुरक्षा

एक विश्वसनीय टेक्नोलॉजी भागीदार

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाली आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत: च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्कद्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.  

चौकशी

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा. आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

  1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
  2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
  3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
  4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
  5. प्रत्येकवेळी उत्कृष्ट सेवा डिलिव्हर करणे