शासनाची भाषा

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा इंटरप्रीटेशन सेवा प्रदाता म्हणून दबिगवर्ड शासन, सार्वजनिक क्षेत्रातील आणि तृतीय क्षेत्रातील संस्थांसाठी परिपूर्ण भागीदार आहे.

आम्ही काय करतो

सार्वजनिक क्षेत्राला सेवा प्रदान करत आहे

सार्वजनिक क्षेत्रातील ४०हून अधिक वर्षांच्या अविरत सेवांनी आम्हाला स्थानिक तसेच राष्ट्रीय शासनांचा भाषेचा भागीदार बनविले आहे.

फेस-टू-फेस/ऑन-साईट इंटरप्रिटिंग

जटिल आणि संवेदनशील परिस्थितीसाठी व्यावसायिक, विश्वसनीय सेवा

व्हिडियो रिमोट इंटरप्रिटिंग

व्हिडियो लिंकद्वारे भाषा सेवांचा जलद, एनक्रिप्टेड ऍक्सेस

टेलिफोन इंटरप्रीटिंग

आपल्या फोनद्वारे त्वरित इंटरप्रीटिंग सेवा

सांकेतिक भाषेचे इंटरप्रीटेशन

कर्णबधीर आणि ऐकायला कमी येण्याऱ्या लोकांसाठी अधिकृत ऑनसाईट आणि रिमोट भाषा समर्थन

परिपूर्ण इंटरप्रीटिंग सेवा भागीदार

४० वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक क्षेत्राला सेवा पुरविताना आम्ही शासनाला लक्षात ठरून समाधानांची निर्मिती केली आहे. आमचे १५००० भाषातज्ञांचे नेटवर्क आमच्या वर्डसिंक प्रणालीद्वारे ऍक्सेस करता येते, जे आपल्या मागणीप्रमाणे तत्परतेने सर्वोत्तम भाषातज्ञ शोधण्यासाठी आणि त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी एआय सोअर्सिंगचा वापर करते. आपण कसे आणि कोठे पैसे वाचवू शकता हे दर्शविणारी तपशीलवार व्यवस्थापन माहिती देऊन वर्डसिंक आम्हाला खर्चाच्या कार्यक्षमतेबद्दल तपशीलवार माहिती देते.

 1. व्यवस्थापनाच्या माहितीचे विश्लेषण
 2. अभिनव सेवा
 3. स्वयंचलन

एकीकृत प्लॅटफॉर्म

अभिनव गुणवत्तेचे आश्वासन देणारे
तंत्रज्ञान

वर्डसिंक हा दबिगवर्ड समुहाचा भाषा-सॉफ्टवेअर समाधान प्रदान करणारा एकीकृत प्लॅटफॉर्म आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आणि ब्रॅण्ड्सपासून, ज्यामध्ये सिलिकॉन व्हॅली मधील सुप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे, ते ब्रिटिश आणि यूएस शासकीय विभागांपर्यंत आमच्या सर्व ग्राहकांकडून याचा वापर केला जातो.

 1. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिक्युरिटीद्वारे सुरक्षित
 2. इंटरनेट कनेक्शनद्वारे कुठूनही ऍक्सेसिबल आहे
 3. इंटरप्रिटर्स आणि सेवा वापरकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी मोबाईल ऍप्स
 4. व्यवस्थापनाचे विस्तारित रिपोर्टिंग
 5. अंगभूत स्वयंचलन आणि एआय समर्थित सेवा

मोबाईल ऍप्स

त्वरित इंटरप्रिटर सपोर्ट

आमचे ग्राहक आणि कॉन्ट्रॅक्टर मोबाइल ऍप्स २५० हून अधिक भाषांमध्ये इंटरप्रिटर्सना त्वरित ऍक्सेस देतात

कॉन्ट्रॅक्टर ऍप

वर्डसिंकची रचना करताना आम्ही भाषातज्ञ आणि ग्राहकांना प्रवास करत असताना देखील त्यांच्या शेड्यूलवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी अनुषंगिक मोबाईल ऍप्स विकसित केले. आमचे ऍप्स इंस्टॉल करून भाषातज्ञ ते जिथे असतील तिथून त्वरित ग्राहक बुकिंग स्वीकारू शकतात.

 1. रिअल टाईम बुकिंग शेड्यूल
 2. टाईमशीट व्यवस्थापन
 3. परस्परसंवादी नकाशा

ग्राहक ऍप

आमच्या भागीदार क्लायंट ऍपद्वारे ग्राहक त्यांच्या शेड्यूलचे पुनरावलोकन करू शकतात, त्यांना त्यांच्या अपॉइंटमेंटची आठवण करुन देणाऱ्या अधिसूचना प्राप्त करू शकतात, प्रमाणीकरणासाठी टाईमशीट प्रस्तुत करू शकतात आणि एका बटणाच्या स्पर्शाद्वारे टेलिफोन इंटरप्रिटिंग कॉल करू शकतात.

 1. सुरक्षित, २५६-बिट एन्क्रिप्शन
 2. त्वरित टेलिफोन इंटरप्रिटिंग ऍक्सेस
 3. इंटरप्रिटर उपलब्धता वैशिष्ठ्य

प्राधान्य कॉलिंग

पोलिसदल, न्यायक्षेत्र, आरोग्यसेवा आणि आपत्कालीन सेवांसाठी खास संरचीत केलेले वर्डसिंक आपत्कालीन सेवांच्या कॉलला प्राधान्य देते. मानवी संवादातील विलंब कमी करण्यासाठी वर्डसिंकद्वारे पूर्णपणे स्वयंचलित केलेले आमची टीआय प्रायोरीटी कॉलिंग सेवा आपल्याला काही सेकंदातच इंटरप्रिटरशी जोडेल.

जास्तीत जास्त सुरक्षितता

सुरक्षित, एन्क्रिप्टेड कॉलिंग

जास्तीत जास्त विश्वसनीयता

९९% कॉल पूर्तता

सुरक्षा आणि अनुपालन

सुरक्षा आणि अनुपालन

आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या आमच्या ग्राहकांच्या वचनबद्धतेशी जुळवून घेण्याचे वचन देत दबिगवर्ड हे १००% कार्बन मुक्त आहे.

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आपल्याला कोणतीही चिंता करायला लागू नये म्हणून प्रत्येक फेस-टू-फेस इंटरप्रीटरने आमची कठोर भरती आणि सुरक्षा प्रक्रिया उत्तीर्ण केली आहे ज्यामध्ये एनहान्स्ड डीबीएस (डिस्क्लोजर आणि बारिंग सर्व्हिस) तपासणीचा समावेश आहे. आम्ही केवळ उचित भाषातज्ञ पुरवू, ज्यांच्या कौशल्यांचे भरतीदरम्यान कसून मूल्यांकन केले गेले आहे. रोजगार हा त्यांनी स्वाक्षरी केलेल्या गोपनीयता कराराच्या आणि व्यापक आचारसंहितेच्या अधीन आहे.

आमच्या गुणवत्तेची हमी देण्याच्या प्रक्रिया गुणवत्ता व्यवस्थापनासाठी ISO9001 ने सांगितलेल्या प्रमाणापर्यंत मान्य केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे आम्ही वापरत असलेले कॉन्ट्रॅक्टर्स व्यावसायिक, सुरक्षित आणि कुशल आहेत याबद्दल आमचे ग्राहक खात्रीशीर राहतात.

  

संपर्क साधा

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा. आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

 1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
 2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
 3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
 4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
 5. प्रत्येक वेळी उत्कृष्ट सेवा वितरित